corona report of 2 jalgaon suspects gets negative  
नाशिक

जळगावकरांना दिलासा; मृत्यू झालेल्या दोघांचा "कोरोना'अहवाल निगेटीव्ह

सरकारनामा ब्युरो

जळगाव : "कोरोना' सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 33 वर्षीय युवकांचा व 62 वर्षीय वृध्द महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला होता. या दोंघाचा "कोरोना'अहवाल निगेटीव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी जाहिर केल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. या शिवाय संशयीत असलल्या इतर चौदा जणांचा अहवालही निगेटीव्ह आला आहे.

"कोरोना'चा संशय असल्याच्या कारणावरून एका 33वर्षीय युवकास व बासष्ट वर्षीय वृध्द महिलेस जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवार (ता.4) रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मयत झालेल्या या दोघं संशयीतांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ते निगेटीव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यानीं आज पत्रकारांना सांगितले. 

या शिवाय इतर 14 संशयीतांचा अहवालही निगेटीव्ह आला असल्याची माहिती त्यांनी दिली.यामुळे अहवालामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT